राजाळे ‘एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव’ मंडळाच्या अध्यक्षपदी अमित निंबाळकर तर उपाध्यक्षपदी हितेश जाधव यांची निवड
26 वर्षाची अखंड परंपरा:
फलटण: राजाळे तालुका फलटण येथील एक गाव एक गणपती गणेशोत्सव मंडळाची 2026 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे.
मंडळाचे अध्यक्षपदी अमित भगवानराव निंबाळकर उपाध्यक्षपदी हितेश भीमराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून फलटण तालुक्यातील एक गाव एक गणपती असलेले राजाळे हे एक गाव आहे.त्याचा आदर्श इतर गावांनी ही घेण्याची गरज निर्माण झाली. त्यांचे या निवडीबद्दल ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.
Views: 2








