विश्वासराव भोसले गटातील 2 विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा लवकरच राजे गट शिवसेनेत प्रवेश?
फलटण: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी यांची राजाळे ग्रामपंचायत व सोसायटीवर एकहाती सत्ता आहे.
परंतु त्यांना पक्षाकडून राजाळे गावात सांगवी पंचायत समितीसाठी उमेदवारी खेचून आणता आली नसल्याने त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
त्यातच राजे गटाकडून राजाळे गावातील सौ.पुष्पा चोपडे यांना उमेदवारी मिळाली असल्याने गावातच दोन गट असलेला राजे गट एक झालेला दिसून येत आहे.
अशातच राजे गटामध्ये विश्वासराव भोसले गटातील नाराज 2 विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा लवकरच जाहीर प्रवेश होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
यामुळे भोसले गटाला हा मोठा धक्का असणार आहे. मागील वर्षभरापूर्वी राजे गटाने शाळा कमिटी निवडणुकीत बाजी मारली आहे.अशातच विद्यमान ग्रामपंचायत 2 सदस्य गटातून बाहेर पडत असल्याने पंचायत समिती निवडणुकीत व होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत याचा नक्कीच परिणाम होईल.









