फलटणचे ॲड.संदीप कांबळे यांची युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड
फलटण. फलटण येथील शिवसेनेचे युवा नेते ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांची युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सातारा जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली.
सातारा येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वंदनीय कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय ना. श्री.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तरुण पिढीला आत्मसात करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.
या निवडीबद्दल बोलताना ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांनी सांगितले की युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाच्या प्रती मी शिवसेनेच्या संघटन बांधणीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार माननीय मुख्यमंत्री साहेबांची पक्षाच्या बाबतची असणारी संघटनात्मक बांधणी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून मी प्रयत्न करणार असून आपला सातारा जिल्हा हा गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्याची सुरुवात माझ्या घरापासून माझ्या गावापासून म्हणजेच फलटण शहराजवळ असणाऱ्या संतोषगड आणि वारुगड या किल्ल्यापासून करणार आहे.
सकारात्मक विचाराच्या तरुणांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी पण मी बळकट प्रयत्न करणार असून लवकरच याबाबत माझ्या कार्यास सुरुवात करत आहे.
या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील तरुणांना सहभागी करून शिवसेना पक्षाचे विचार तळागाळात पोचवण्याचे काम करणार आहे.
माननीय नामदार पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करताना शिवसेना पक्षाचे श्री धनंजय साळुंखे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सचिव, श्री संभाजी पाटील सातारा जिल्हाध्यक्ष युवासेना तसेच भूषण वर्पे युवा सेना प्रमुख सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण तालुक्यात कट्टर युवा शिवसैनिकाला संधी दिल्याबद्दल सर्वत्र ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांचे अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.








