राजाळे ता.फलटण येथील एक गाव एक गणपती मंडळाच्या मागील वर्षातील विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी श्रावण महिन्यानिमित्त खास सहलीचे आयोजन!
राजाळे गावचे युवा नेतृत्व समाजसेवक विनोदशेठ शेडगे यांच्या माध्यमातून 250 महिलांचा संपूर्ण खर्च: महिलांनी मानले आभार
फलटण:एक गाव एक गणपती रोप्य महोत्सवी वर्ष सन 2025 गणेश उत्सव मंडळ राजाळे सालाबाद प्रमाणे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात गणरायाला बसवण्यात आले कोणत्याही जातीपातीचा विचार न करता प्रत्येक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आरतीचा मान प्रत्येक मंडळाला देण्यात आला होता तसेच त्यानंतर प्रत्येक मंडळाच्या नाटकाचा कार्यक्रम गेली दहा दिवस साजरा करण्यात आला व प्रत्येक मंडळाला नाटकाच्या स्पर्धेमध्ये सहभाग करून प्रत्येक मंडळाला बक्षीस वितरण देण्यात आले त्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये गौरीचे आगमन झाल्यानंतर गौरी सजावट स्पर्धा संपूर्ण गावासाठी आयोजित केली होती त्यामध्ये देखील प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले तसेच ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला अशा प्रत्येक स्पर्धकाला देखील बक्षीस देण्यात आले शेवटच्या दहाव्या दिवशी गणरायाची मोठ्या थाटामाटामध्ये मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक मंडळाला चौक सजावटीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक मंडळांनी चौक सजावट करत गावात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते त्यामध्ये देखील चौक सजावटीसाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व सहभाग घेणारा ला देखील बक्षीस देण्यात आले. अशा वातावरणामध्ये गेली 10 दिवस राजाळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करत गुण्या गोविंदाने गणरायाला निरोप देत असताना ट्रॉली डेकोरेशन याच्या देखील स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले होते.सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मंडळाला देखील बक्षीस देण्यात आले. या संपूर्ण दहा दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये एक गाव एक गणपती राजाळे या गावांमध्ये समाजसेवा करणारे एक समाजसेवक म्हणून मंडळाला लाभलेले समाजसेवक विनोदशेठ अंकुशराव शेडगे यांच्या वतीने प्रत्येक दिवशी महिलेंसाठी लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या आणि हा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण महिलांसाठी एक सहल आयोजित करण्यात येणार होती.
ही सहल 19 ऑगस्ट 2026 या दिवशी पहाटे चार वाजता या सहलीसाठी पाच ट्रॅव्हल्स राजाळे गावातून घेऊन जाताना उद्घाटन सोहळा राजाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संभाजीबापू निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला आणि सहलीचे उद्घाटन करण्याचा मान त्यांना मिळाला त्यानंतर सहल थेट कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाऊन थांबली महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर कनेर मठ पन्हाळा गड व जोतिबा दर्शन असं एक दिवसाचं सहलीचे नियोजन करण्यासाठी एक गाव एक गणपती गणेशोत्सव मंडळाला यश प्राप्त होत असताना समाजसेवक विनोद शेठ शेडगे यांनी महिलांसाठी सकाळचा नाष्टा दुपारचे भोजन व संध्याकाळचे भोजन याची सुंदर अशी व्यवस्था करत पुन्हा सायंकाळी परतीच्या प्रवासाच्या वेळी पाच ट्रॅव्हल्स मधून लकी ड्रॉ काढण्यात आला आणि पाच महिलांना विनोद शेठ शेडगे यांच्या वतीने पाच पैठणी देण्यात आल्या. याप्रसंगी सर्व महिलांच्या वतीने समाजसेवक श्री.विनोदशेठ शेडगे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांच्या मधून सौ .रुपाली दत्तात्रय तोरसे मॅडम यांनी समाजसेवक विनोदशेठ शेडगे यांना शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. पुरुषांना कुठेही फिरता येतं परंतु महिलांना कुणी देखील घेऊन जात नाही ते काम विनोदशेठ यांच्या माध्यमातून करण्यात आलं.अतिशय महिलांना आनंदाचा दिवस त्या ठिकाणी घालवण्यात आला आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये एक गाव एक गणपती गणेशोत्सव मंडळ राजाळे या मंडळाच्या वतीने ही सहल आनंदमय वातावरणामध्ये संपन्न करण्यात यश प्राप्त झाले.








