फलटण पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्याकडून 35 लाख 32 हजाराचा अपहार; आरोपीला पोलिस कोठडी  पंचायत समितीची अब्रु वेशीवर टांगणीला;अजून कोणते बडे मासे सापडणार?  पंचायत समिती लुटणारे दरोडेखोर: भाग 1


फलटण पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्याकडून 35 लाख 32 हजाराचा अपहार; आरोपीला पोलिस कोठडी

 

पंचायत समितीची अब्रु वेशीवर टांगणीला;अजून कोणते बडे मासे सापडणार?

पंचायत समिती लुटणारे दरोडेखोर: भाग 1

फलटण: फलटण पोलिस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार, व अशोक महादेव कोकरे, व्यवसाय नोकरी, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग, फलटण, यांचे फिर्यादी जबाबीवरून,

 

समक्ष फलटण शहर पोलीस ठाणे येथे हजर राहुन देतो खबरी जबाब की, मी वरील ठिकाणी दि.29/07/2026 पासून ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग फलटण येथे कार्यरत आहे.

 

ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग फलटण येथे राजू नुरमहमद पठाण रा.आदर्की

ता. फलटण जि.सातारा हे जुन 2023 पासून ते दि. 25/03/2026 रोजी पर्यंत कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते. त्यावेळी ते तेथील कार्यालयातील कर्मचा-यांचे सेवार्थ प्रणालीव्दारे पगार काढत होते. राजू नुरमहमद पठाण यांना मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. सातारा यांचेकडील

 

जा.क्र.साप्रवि/आस्था/2(2) कावि-545/2026 दि. 13/3/2026 अन्वये त्यांनी शासकीय रकमेचा अपहार करुन कर्तव्यात कसूर करुन, कागदपत्रांची बनावटगिरी करुन गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्याने निलंबीत करणेत आले आहे. म्हणुन उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग फलटण यांनी दि. 25/03/2026 रोजी निलंबन झाल्यामुळे राजू पठाण यांना कार्यमुक्त केले आहे.राजू नुरमहमद पठाण हे कनिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग फलटण येथे कार्यरत असताना त्यांनी आपले पदाचा गैरवापर करुन खालील तीन वेगवेगळ्या मार्गाने एकूण 35.32.441/- रुपयाचा अपहार केला आहे.

 

1. सेवार्थ प्रणालीचा वापर करुन वेतनाचा अपहार (रुपये 21,70.815/-) राजू नुरमहमद पठाण यांनी जुन 2023 ते मार्च 2026 पर्यंत पंचायत राज सेवार्थ प्रणाली मधून त्या कार्यालयातील लोकसेवकाचा पगार ते काढत असताना त्यांनी त्यांचे अधिकराचा गैरवापर करून अनाधिकृत कार्यपध्दतीचा अवलंब केला व खोटे रेकॉर्ड तयार करुन बेसीक एरियर्स आणि अतिरिक्त वेतन या सदराखाली नियमबाह्य अनुज्ञेय नसलेली एकूण रक्कम 21,70,815 रुपये स्वताच्या वेतनात समाविष्ठ करून स्वताच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक सातारा शाखा खंडाळा खाते क्र. 1015006030118 या खात्यात वर्ग केली आहे. जुलै 2025 मध्ये वेतनवाढ लागू नसतानाही नियमबाह्य ती काढून त्यांचा आर्थिक लाभघेतला आहे.

 

2. शासकीय कराचा अपहार (रुपये 10,41,406/-) टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा टँकर देयकातील आयकर कपातीची रक्कम शासनाकडे भरणे आवश्यक होते पठाण यांनी कार्यालयाच्या बैंक ऑफ महाराष्ट्र (खाते क्र.60478328768) मधील खात्यातून दोन धनादेशांद्वारे राजू पठाण यांनी शासनाचे पैसे स्वताचे एसबीआय बँक शाखा फलटण (खाले क.20118387316) या खात्यात वळवले धनादेश क्र.100951 अन्वये रुपये 1.37.288/- व धनादेश क्र. 100953 अन्वये रु.9.04,118/- रुपये हा अपहार लपवण्यासाठी राजू पठाण यांनी आमचे कार्यलयाचे बॅक ऑफ महाराष्ट्रचे धनादेश पुस्तकाच्या काउंटर स्लिपवर आयकर टँकर अशी खोटी नोंद करुन कार्यालयीन दस्तऐवजात बनावटगीरी केली आहे.

 

3. कर्मचा-याच्या अशासकीय कपातीचा अपहार (रुपये 3,20,220/-) उपअभियंता कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग फलटण यांच्या स्टेंट बँक ऑफ इंडिया (खाते क्र.35359952872) या खात्यामध्ये कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहिन्याला सोसायटी, बँक कर्ज आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांची रक्कम कपात करून जमा होत असते. सदरचे कामकाज हे राजू पठाण स्वता करीत होते त्यांनी जुन 2023 ते मार्च 2026 या कालावधीत कर्मचा-यांची सोसायटी, बँक कर्ज आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांना देय असलेली रक्कम एकूण 3,20,220/- ही सबंधीत संस्थांना न पाठवता या कार्यालयाच्या स्टेट बैंक आफ इंडिया खाते क्र. 35359952872 चे धनादेशाव्दारे सदरची रक्कम स्वताचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फलटण खाते क्र. 20118387316 या खात्यावर वळवून सदर रकमेचा अपहार केला आहे.

 

तरी जुन 2023 ते मार्च 2026 पर्यंत राजू नुरमहमद पठाण रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण जि. सातारा हे ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग फलटण येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असताना शासकीय पदाचा गैरवापर करुन बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहे असे भासवून व वापरुन तसेच शासकीय संगणक प्रणालीत (सेवार्थ) मधून कर्मचा-यांच्या वेतन देयकाचे प्रती काढून त्याप्रती मधील वेतनाचे आकडयांची फेरबदल करुन काढलेल्या बनावट प्रर्तीवर कार्यलयातील तत्कालीन उपअभियंता यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या सहया घेऊन सदर बनावट देयके पंचायत समीतीचे सहाय्यक लेखा अधिकारी यांना पडताळणी करीता देऊन व त्यानंतर त्या देयकांच्या प्रती राजू पठाण यांनी जतन करणे हा त्यांचे कामाचा भाग असताना त्यांनी सदर देयकांच्या प्रती जतन करुन न ठेवता त्या नाश केल्या आहेत. अशा प्रकारे राजू पठाण यांनी बेकायदेशीरपणे देयकांचे प्रतीमध्ये फेरफार करुन आमचे कार्यालयाचे एकूण रुपये 35,32,441/- रक्कमेचा अपहार केला आहे. त्यानंतर त्याने नातेवाईकांचे मार्फतीने 10,34,349/- रुपये एवढी रक्कम आमचे कार्यालयाचे बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते क्र. 60478328768 मध्ये वेळो वेळी भरलेली दिसून आलेली आहे म्हणुन राजू नुरमहमद पठाण यांनी शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली आहे म्हणुन माझी राजू नुरमहमद पठाण रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण जि. सातारा यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार आहे.

 

 

आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. फलटण शहरचे प्रमुख पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे करीत आहेत.


राजाळे ता.फलटण येथील एक गाव एक गणपती मंडळाच्या मागील वर्षातील विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी श्रावण महिन्यानिमित्त खास सहलीचे आयोजन! राजाळे गावचे युवा नेतृत्व समाजसेवक विनोदशेठ शेडगे यांच्या माध्यमातून 250 महिलांचा संपूर्ण खर्च: महिलांनी मानले आभार 

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजाळे ता.फलटण येथील एक गाव एक गणपती मंडळाच्या मागील वर्षातील विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी श्रावण महिन्यानिमित्त खास सहलीचे आयोजन! राजाळे गावचे युवा नेतृत्व समाजसेवक विनोदशेठ शेडगे यांच्या माध्यमातून 250 महिलांचा संपूर्ण खर्च: महिलांनी मानले आभार 

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

error: Content is protected !!