जावली येथील अदिती बजरंग पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

जावली येथील अदिती बजरंग पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

फलटण: जावली ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवार हिची नवोदय परीक्षेमधून नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे.

तिला वर्गशिक्षक श्री. कल्याण वाघमोडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवलकर सर ,जगताप सर गायकवाड सर, ओबासे सर, येळणे मॅडम, काळे मॅडम या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही विद्यार्थ्यांनी असून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. ती जावली येथील सिद्धनाथाचे सालकरी पुजारी बजरंग पवार यांची कन्या आहे.

तिने मिळविलेल्या या यशाबद्दल जावली गावचे ग्रामस्थ ,नातेवाईक, यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!