जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी  वडले सोसायटीकडून रणजीत सोनवलकर यांचा ठराव! लोकनियुक्त सरपंच डॉ.संतोष लाळगे यांच्याकडून अभिनंदन


जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी  वडले सोसायटीकडून रणजीत सोनवलकर यांचा ठराव!

 

लोकनियुक्त सरपंच डॉ.संतोष लाळगे यांच्याकडून अभिनंदन

फलटण (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वडले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संस्था प्रतिनिधी म्हणून रणजीत सोनवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल वडले ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. संतोष लाळगे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. संतोष लाळगे म्हणाले की, वडले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालकांनी रणजीत सोनवलकर यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. संचालकांनी दाखविलेल्या विश्वासाला ते निश्चितच सार्थ ठरवतील. तसेच, राजे गटाच्या विचारांशी व शिवसेनेच्या ध्येय-धोरणांशी एकनिष्ठ राहून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे, निष्ठेने व यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रणजीत सोनवलकर यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देताना लोकनियुक्त सरपंच डॉ. संतोष लाळगे यांनी त्यांच्या कार्यामुळे संस्थेचे, गावाचे आणि सहकार क्षेत्राचे नाव अधिक उज्ज्वल होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!