म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हसवड प्रतिनिधी: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. व्ही. सी. काकडे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपदही भूषवले. महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेश कुमार सोनवणे यांनी ग्रंथालय विषयी दोन शब्द सांगितले.

ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एम. एस. शिंगाडे यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.या ग्रंथ प्रदर्शनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय सेवक आणि बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या ग्रंथालय शास्त्र विभागात बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

IQAC समन्वयक व विभाग प्रमुख इंग्रजी विभाग प्रा.रणवरे डी.जे ,डॉ.सुजित जाधव विभाग प्रमुख बॉटनी तसेच मराठी व प्रमुख डॉ. महेशकुमार सोनवणे तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस .बी टिळेकर,डॉ.सरक ब्रह्मदेव गणपती, फिजिकल डायरेक्टर बापू कोळेकर , रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पवार आर.जी, ग्रंथालय कर्मचारी आडगळे राजेंद्र,तसेच बोडरे अविनाश व कॉमर्स विभागातील विद्यार्थी यश माने इ. उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!