जीवन विद्या मिशन शाखा फलटण यांचे वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा                 

जीवन विद्या मिशन शाखा फलटण यांचे वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

फलटण: शनिवार दिनांक 8.08.2026 फलटण,कोळकी रोड, विसावा हॉटेल या ठिकाणी गुरुपौर्णिमा ऐश्वर्यातसंपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी फलटण मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, नामधारक आणि आजूबाजूचे, बारामती, जेजुरी,विडणी,वाठार,आणि इतर गावचे प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

कार्यक्रम वेळेत चालू झाला, जीवनविद्या मिशनचा उपासना यज्ञ, नामसंकीर्तन, आणि विशेष म्हणजे *मानसपूजा* ऐश्वर्यात संपन्न झाली. त्यानंतर *गुरुपूजन* अत्यंत ऐश्वर्यात झाले, उपस्थित सर्वच व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला.

वास्तूमध्ये स्वतः सद्गुरु आणि माई वास्तव्याला होती, याची अनुभूती येत होती.अतिशय मंगलमय आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.

गुरुपूजन कार्यक्रमानंतर,

सद्गुरु महिमा अगाध

या विषयावर बारामतीचे आदरणीय सुहास पवार यांचे सुश्राव्य प्रबोधन झाले.सद्गुरूंचे महत्त्व,महात्म्य,महती,मानवजातीच्या  जीवनातील त्यांचे स्थान, वरील उत्कृष्ट असे प्रबोधन झाले. ग्रंथदिंडी ही छान प्रकारे झाली.लोकांनी आवडीने सद्गुरूंचे ग्रंथ घेतले. यासाठी बारामती शाखेचे खूप मोठे सहकार्य मिळाले.

सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केले होते, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

एकंदरीत कार्यक्रम खूप ऐश्वर्यातसंपन्न छान झाला सर्वांना धन्यवाद धन्यवाद..

सद्गुरूंना विशेष धन्यवाद त्यांनीच कार्यक्रम आमच्याकडून करून घेतला.

आपला

प्रभाकर पाटील

सुनीता प्रभाकर पाटील.

विसावा हॉटेल, फलटण

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

error: Content is protected !!