विडणी येथील एकाचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर समोरील डांबरी रस्त्यावर अपघात व मृत्यु!

विडणी येथील एकाचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर समोरील डांबरी रस्त्यावर अपघात व मृत्यु!

फलटण शहर: फलटण शहर पोलिस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व अजय हरिभाऊ राऊत, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा,समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर दिलेल्या खबरी जबाबवरून

, वरील ठिकाणी मी माझी पत्नी सुरेखा, आई रुक्मिणी व चार मुली श्रावणी, श्रेया, संजिवणी व समृद्धी असे आम्ही एकत्रात राहणेस आहोत. माझा चुलत भाऊ देविदास वामन राऊत, वय 46 वर्षे, व्यवसाय शेती, रा.विडणी, ता. फलटण, जि. सातारा हा त्याची पत्नी निलम, आई लक्ष्मी, वडील वामन, मुलगी प्रतिक्षा असे माझे घराचे शेजारी राहणेस आहेत. व त्याचा मुलगा प्रतिक हा लिंब, ता.जि. सातारा येथे इंजिनीयरींगचे शिक्षण घेत आहे.

दि. 17/08/2026 रोजी रात्रौ 11.00 वा. चे सुमारास मला आमचे गावातील सरपंच सागर कांतिलाल अभंग यांनी फोन करुन सांगितले की, तुमचा चुलत भाऊ देविदास वामन राऊत यांचा रामराजे शॉपिंग सेंटर समोरील डांबरी रोडवर मोटारसायकल वरुन पडुन अपघात झाला आहे. त्यास सरकारी दवाखाना फलटण येथे उपचारास दाखल केले आहे. असे सांगितले नंतर मी. आमचे गावचे सरपंच सागर अभंग, प्रकाश राऊत, संतोष नाळे, धनाजी मदने असे मिळुन सरकारी दवाखाना फलटण येथे आलो. तेथे देविदास वामन राऊत यास पाहीले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन तो मयत झालेचे सांगितले आहे. तदनंतर मी व आमचे गावचे सरपंच सागर अभंग असे फलटण शहर पोलीस ठाणेस आलो. त्यावेळी महीला नामे सविता भरत कुंभार. रा. कुंभारभट्टी,मलठण, ता. फलटण, जि. सातारा हीने सांगितले की, देविदास वामन राऊत यांनी फलटण एस.टी. स्टॅन्ड जवळुन मला त्यांचे मोटार सायकलवरती पाठीमागे बसवुन घेवुन मला माझे घरी सोडतो म्हणाले होते व त्यांनी सदर मोटारसायकल रामराजे शॉपींग सेंटरचे समोरील डांबरी रोडने घेतली. त्यावेळी देविदास वामन राऊत यांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगाने चालवलेने रात्रीच्या 10.30 वा.चे सुमारास ते स्वताः मोटार सायकलसह मला घेवुन रोडवर पडले. त्यावेळी तेथील लोक जमा झाले व मला कपाळावर मुक्का मार लागला होता. व देविदास वामन राऊत हे उताणे स्थितीत रोडवर पडले होते. त्यांना बोलता येत नव्हते ते बेशुद्ध झाले होते. त्यांच्या डोकीत मुक्का मार लागला असावा. तेथे लगेच पोलीस ही आले. देविदास वामन राऊत यांना उपचारासाठी अॅम्ब्युलन्स मधुन उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे पाठवुन दिले आहे. तेथील डॉक्टरांनी तपासुन देविदास वामन राऊत हे मयत झालेचे सांगितले आहे.

माझा चुलत भाऊ देविदास वामन राऊत हा स्वताः च्या ताब्यातील हीरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल क्र. MH 11 CK 7410 हीचेवर पाठीमागे महीला नामे-सविता भरत कुंभार हीस बसवुन स्वताः मोटार सायकल चालवुन मोटार सायकलसह रोडवर पडुन अपघात करुन महीला सविता भरत कुंभार हीस किरकोळ जखमी करुन स्वताः चे मरणास कारणीभुत झाला आहे.

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल! “घरकुले लुटणारे गाव टगे”: भाग-5

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल! “घरकुले लुटणारे गाव टगे”: भाग-5

error: Content is protected !!