साठे फाटा येथील अवैद्य दारू विक्रेत्यावर फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई!
फलटण : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांना मिळालेल्या खबरीवरून त्यांच्या टीमने पोलिस हवालदार सागर अभंग यांनी साठेफाटा येथील अवैध दारू विक्रीवर धाड टाकली आहे.
दिनांक 18/08/2026 रोजी 18.45 वा.ने सुमाराम मौजे साठे, दिनांक १२/०८/२०२६ रोजी २२.१४ वा साठेफाटा गावचे हद्दीत नारायण हणमंत माने, वय 42 वर्ष, साठे, ता. फलटण, जि.सातारा याने साठेफाटा येथील पानटपरीच्या आडोश्याला उघडयावरबेकायदा, विनापरवाना स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता देशी दारुची चोरटी विक्री करत असताना 720/- रु.किंमतीचा प्रोव्हीविशन माल आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला. त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.








