फलटण तालुक्यात खळबळजनक घटना! महिलेचा विनयभंग व मारहाण; एकावर गुन्हा दाखल!


फलटण तालुक्यात खळबळजनक घटना!

महिलेचा विनयभंग व मारहाण; एकावर गुन्हा दाखल!

 

फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत हजर राहून लिहून दिलेल्या जबाबावरून व पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार

 

संबंधित महिला टाकळवाडे ता.फलटण गावी ती 2 मुले, पुतण्यासह एकत्रात राहणेस आहे. गावी घर जमीन असून शेती व्यवसाय आहे.महिलेचे पती हे चालक म्हणून काम करीत असून ते बंगलोर ते पुणे अशी ट्रॅकने मालाची वाहतूक करीत असतात.आई 8 दिवसापुर्वी महिलेकडे राहायला आली आहे.

 

दि. 18/08/2026 रोजी दुपारी 01.00 वा. चे सुमारास संबंधित महिला घराचे शेजारी शेतात मका पिकास पाणी देत असताना दुपारी 04.00 वा. चे सुमारास मका पिकास पाणी देत असताना दिर सुनिल रामदास मिंड यांनी पाठीमागून मिठी मारून अंगाशी झोंबाझोंबी करून माझे मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले.

 

त्यावेळी मी आराडा ओरडा करून आमचे घरी पळत आले. त्यावेळी माझे पाठीमागून सुनिल रामदास मिंड हे आले मी आरडा ओरडा करत असल्याने सदरचा प्रकार कोणास सांगू नको असे म्हणून मला तेथील लोखंडी पाईपने डावे हातावर,डावे पायावर तसेच डोकीस मारहान केली. त्यावेळी भांडणे सोडवणेस संबंधित महिलेची आई हि आली असता तिला सुध्दा हाताने लाथ्थाबुक्याने मारहान करून जीवे मारण्याची धमकी दिली.

 

त्यानंतर महिला फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी आली असता मेडीकल यादी दिल्याने उपजिल्हा रूग्नालय फलटण,मेडीकल कॉलेज बारामती येथे उपचार करून आज रोजी तक्रार दिली असल्याने.अशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झालेली असून

 

 

संशयित आरोपी सुनील रामदास मिंड यांच्यावर भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार कलम 74,118(1),115(2),352,351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस सागर अभंग करीत आहेत.


महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

error: Content is protected !!