देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा!
अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
फलटण: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा फलटणचे अध्यक्ष मंदाकिनी गायकवाड व त्यांचे अनेक कार्यकर्ते यांच्या अतिशय सुंदर नियोजनाने व गणपती उत्सव अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सचिव व संपूर्ण कमिटीचे सर्व सदस्य यांचे कठोर परिश्रम व कौशल्य पूर्ण आयोजन गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री आठ वाजता टाकळवाडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बारामती व विवेकवसा फाउंडेशन कृत व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते श्री दादासाहेब कोळी साहेब माजी सैनिक व श्री सुनील महामुनी सर माजी मुख्याध्यापक यांच्या द्वारा यां कार्यक्रमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, चमत्कारांच्या प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, सर्प विज्ञान, विवेकवसा फाउंडेशन कृत व्यसनमुक्ती, महिला सशक्तिकरण, जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, वायुप्रदूषण, व्यक्तिमत्व विकास, अनिष्ट रूढी परंपरा निर्मूलन, विधवा महिला निर्मूलन, विवेकी जागर, मनोरंजनातून विज्ञान आणि विवेकाची सांगड घालून जिज्ञासा निर्माण करणारा विविध विषयांवरती अतिशय सुंदर कार्यक्रम व विविध बहारदार प्रात्यक्षिकांसह आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजप्रबोधनपर प्रभाव टाकत हसत खेळत कार्यक्रम संपन्न झाला.
शेवटी विवेकवसा फाउंडेशन कृत आदरणीय मंदाकिनी गायकवाड यांच्या द्वारा व्यसनमुक्तीची सर्वांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.








