पंचायत समिती फलटणच्या सभापती शिवांजलीताई भोसले यांच्या माध्यमातून उद्या साखरवाडी येथे NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्प
फलटण: साखरवाडी-पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी व होळ* येथील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या सहकार्याने NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
*एसटी महामंडळाच्या प्रवासासाठी सवलत मिळणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.*
📍 कॅम्पची माहिती
*दिनांक : शनिवार, ८ ऑगस्ट २०२६*
*स्थळ : साखरवाडी ग्रामपंचायत*
*वेळ : सकाळी १०.३० वाजता*
👵👩🦳 विशेष आवाहन
साखरवाडी-पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी आणि होळ येथील महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला तसेच ७५ वर्षे पूर्ण असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांनी या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.
एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्या NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी आवर्जून करून घ्यावी.
*येताना सोबत मोबाईल घेऊन यावा.*
✅ नोंदणीनंतर ३० दिवसांनी NCMC कार्ड मिळेल.
✅ NCMC कार्ड गावातच पोहोच मिळेल.
*साखरवाडी-पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी व होळ येथील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, ही नम्र विनंती.*
आयोजक :
*कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले*
*सभापती, पंचायत समिती फलटण*
सदस्या, सातारा जिल्हा आरोग्य समिती
🚌 “डिजिटल महाराष्ट्र – सुरक्षित व सुलभ एसटी प्रवास” 🙏








