आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार
स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघाता/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा खुलासा करावा!
फलटण: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी फलटणचे आमदार श्री सचिन पाटील यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
वास्तविक पाहता फलटण सारख्या राजकीय दृष्ट्या जागृत मतदार संघाचे राज्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणारे आमदार महोदयांनी प्रथम याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली असती तर बरे झाले असते वास्तविक पाहता हे वक्तव्य श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले नसून काँग्रेसच्या ट्विटर हँडल वरील पोस्ट आहे हे साधी बाब आमदार महोदयांना माहीत नसावी याचेच आश्चर्य वाटते. खरे तर ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात किंवा ज्यांच्यामुळे ते आमदार झाले त्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमाना अपघाताची किंबहुना घातपाताची चौकशीची साधी मागणी ही अद्याप त्यांनी केलेली नाही याबाबत विधानसभेच्या पटलावरती त्यांनी ही मागणी करायला हवी होती पण ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत याबाबत त्यांनी खुलासा करावा खरे तर फलटण शहर व तालुक्यात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आमदार झाल्यानंतर जी काही आश्वासने दिली होती ती त्यांनी आठवावीत आणि त्याची पूर्तता का होऊ शकत नाही याचे आत्मपरीक्षण करावे शहरातून सुरू असलेले पालखी महामार्गाचे काम त्याचा दर्जा याची उत्तम प्रचिती नुकत्याच झालेल्या विजेचे खांब पडण्याच्या घटनेतून आलेले आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची साधी विचारपूस ही त्यांनी केल्याचे दिसून आले नाही.तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे व शेतकरी, बेरोजगार युवक यांच्या बाबतीत वेगवेगळे विषय आहेत त्याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यावे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित वक्तव्य करून आपला राजकीय बालिशपणा त्यांनी तालुक्याला दाखवून दिलेला आहे पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्याचा कृतीचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निषेध मी करतो.
असे वरील निवेदन प्रसिद्धी पत्रकाद्वारे महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)अध्यक्ष,फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.








