वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून विशाल माडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
निवडणूक ताकतीने लढवणार – विशाल माडकर
फलटण: राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणातून वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटात युवा नेते विशाल माडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी निवडणुकीला उभा आहे. लोकांच्या समस्या,मतदार संघातील समस्या सोडवण्यास प्राधान्य असणार आहे.हा अजेंडा घेऊन मी निवडणुकीला उभा असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार विशाल माडकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.









