जिंती येथील बिरोबा मंदिरातील चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी 24 तासात पकडले! पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांची धडाकेबाज कामगिरी!


जिंती येथील बिरोबा मंदिरातील चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी 24 तासात पकडले!

 

पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांची धडाकेबाज कामगिरी!

 

फलटण: जिंती ता. फलटण येथील बिरोबा मंदीरातील चोरीचा छडा फलटण ग्रामीण पोलीसांकडून आरोपी जेरबंद

 

मौजे जिंती ता. फलटण गावच्या हददीतील बिरोबा मंदीरातील चोरीचा फलटण ग्रामीण पोलीसांनी २४ तासाच्या आत तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

 

फियादी हरिष विठठ्ल कोळपे रा. कोळपेवस्ती पिंपळवाडी ता. फलटण यांनी मौजे जिती ता. फलटण गावचे हददीतील बिरोबा मंदीर येथिल मंदीरातील पितळी समई, पितळी घंटा व इतर साहीत्य असा ३२,०००/-रू. किंमतीचा मुद्देमाल हा दिनांक ०३/०९/२०२६ रोजी चे सायंकाळी ०७.०० ते दि.०४/०९/२०२६ रोजी चे सकाळी ११.०० वा.चे दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेहले बाबतची दिले तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५३४/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५,३३१ (३),३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांचे आदेशानुसार पो. हवा. २१४२ पिसे यांचेकडे देण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर मॅडम, उप-विभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे सो यांचे सुचने नुसार व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, पोलिस उप-निरीक्षक शिवानी नागवडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकाने कारवाई केली.पो.हवा. २१४२ पिसे, पो. हवा. ७३१ अडसूळ, पो. हवा.५१६ पवार, पो.कॉ.२४९२ देशमुख यांनी तपास करून गुन्हयातील आरोपी जय संजय वेदपाठक वय २२ वर्षे रा. पिंपळवाडी ता. फलटण यास निष्पन्न करून दि.०५/०९/२०२६ रोजी ००.२० वा. अटक करण्यात आली आहे. त्याने सदर गुन्हा केलेची कबूली दिली असून त्यास मा. कोर्टात हजर ठेवले असता मा. कोर्टाने आरोपी यास दि.०७/०९/२०२६ पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. २१४२ पिसे करीत आहेत.


तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!