उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान
लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
फलटण: 🌸 सस्नेह निमंत्रण 🌸
शालेय किशोरवयीन मुला-मुलींची सद्यस्थिती, मानसिक अवस्था आणि आई-वडिलांबरोबरच्या त्यांच्या वागणुकीत होत चाललेला बदल हा आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील विषय आहे.
पालक–पाल्यांमधील संवाद, विश्वास आणि नाते अधिक दृढ व्हावे, तसेच मुलांमध्ये चांगले संस्कार व सकारात्मक विचार रुजावेत, या उद्देशाने हे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
🎤 प्रमुख मार्गदर्शक
डॉ. प्रा. श्री. वसंत हांकारे सर
🏆 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मा. श्री. शिवाजीराव जायपत्रे
सहायक पोलीस निरीक्षक, लोणंद
यांच्या शुभहस्ते
📅 दिनांक : ७ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ : दुपारी ४ ते ६
📍 स्थळ : सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा
तरी सर्व पालक, पाल्य आणि ग्रामस्थांनी ठरलेल्या वेळी आवर्जून उपस्थित राहून या प्रेरणादायी व्याख्यानाचा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
आपला स्नेहांकित,
श्री. नितीन अशोकराव गायकवाड
निमंत्रक
धरा ह्युमन लाईफ रिजुवेनेशन सोसायटी, तरडगाव
“आई-बाप समजून घेऊया… संवाद वाढवूया… संस्कार घडवूया!” 🌷








