फलटण येथे शनिवारी अनुसूचित जातींच्या  घटनात्मक आरक्षण वर्गीकरण लागू करण्यासाठी जनजागृतीपर सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन !प्रा.सुकुमार कांबळे यांचे प्रमुख मार्गदर्शन!

फलटण येथे शनिवारी अनुसूचित जातींच्या  घटनात्मक आरक्षण वर्गीकरण लागू करण्यासाठी जनजागृतीपर सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन!

प्रा.सुकुमार कांबळे यांचे प्रमुख मार्गदर्शन!

फलटण : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यास घटनात्मक मान्यता देत, संबंधित राज्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण लागू करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्रभर मातंग समाजासह विविध घटकांकडून होत आहे.

याच पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त  फलटण येथे ‘आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, फलटण एसटी स्टँडनजीक, रिंग रोड,हॉटेल मधुदीप समोरील रॉयल क्राउनच्या बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे (सर) राहणार असून, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी, सामाजिक न्याय आणि संबंधित घटकांच्या मागण्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!