संजीवराजेंचा चक्रव्यूह! रणजितसिंह भेदणार ? स्वकीयांमुळे रणजितसिंहांचा अभिमन्यू होणार?


संजीवराजेंचा चक्रव्यूह!

रणजितसिंह भेदणार ?

स्वकीयांमुळे रणजितसिंहांचा अभिमन्यू होणार?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विश्लेषण भाग – 1

फलटण :संपादकीय लेख (अमोल पवार): फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वातावरण जोरदार तापू लागलेले आहे.

 

आमदारकीचा आणि नगरपालिकेचा वचपा काढण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी चक्रव्यूह रचना केलेली दिसून येत आहे. फलटण ग्रामीण भागातील गावगाड्यातील लोकांशी थेट संबंध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे संजीवराजे.यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे एक हाती घेतल्यानंतर ठिकठिकाणी निष्ठावंतांना उमेदवारी दिलेली दिसून येत आहे. यामुळे राजे गटातील कार्यकर्ते चार्ज झालेले आहे. खुशामतगिरी करणाऱ्या चांडाळ चौकडीचे कितपत ऐकायचे ही संजीवराजे यांनी चाणाक्ष  पद्धतीने टाळलेले दिसून येत आहे.राजाचे कान हे पितळेचे असतात ही म्हण खोटी ठरवून, आमदारकीला आणि नगरपालिकेला झालेल्या चुका खुबीने टाळून यावेळी संजीवराजे यांनी चक्रव्यूह आखलेला दिसून येत आहे. कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः संजीवराजे उभा राहतील ही अपेक्षा असताना त्यांनी सह्याद्रीभैया कदम यांना उमेदवारी देऊन वेगळी खेळी खेळली. तर हिंगणगाव गटामध्ये सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर या उभ्या राहतील ही अपेक्षा असताना तेथील स्थानिक निष्ठावंत धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट यांच्या पत्नी सारिका अनपट यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांना संधी दिली. यामुळे आज घडीला राजे गट शिवसेना निवडणुकीत एक पाऊल पुढे असल्याचे चित्र दिसत आहे.

 

तर दुसऱ्या बाजूला खासदार गटाने अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी दिली असल्याचे दिसून येत आहे.यामुळे पक्षांतर्गतच कलह निर्माण झालेला आहे. भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याचे अध्यक्ष अमित रणवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.तर विडणी गटामध्ये माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले गट नाराज असल्याचे दिसून येत आहे. आज पाडेगाव येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेला विश्वासराव भोसले यांची अनुपस्थिती होती. खासदार गटात ही चांडाळ चौकडी तयार झाली असून त्यांचे निर्णय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी धोक्याची घंटा बनू लागले आहेत.

 

या राजकीय परिस्थितीनुसार सध्या भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकत्र निवडणूक लढवत आहेत. व त्यांच्या समोर शिवसेना राजे गटाचे आव्हान उभे आहे.एकंदरीत भाजप व राष्ट्रवादी हे सोशल मीडियावर प्रचार करताना दिसून येत आहे.तर राजे गट प्रत्यक्ष गाठी भेटी करताना ग्राउंडवर दिसून येत आहे. राजे गटाचे निर्णय हे नेते व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन घेतले असल्याचे दिसून येत आहे. तर खासदार गटाचे निर्णय हे नेते व कार्यकर्त्यांना गृहीत धरून घेतले गेल्याचे चित्र दिसून येत आहे. या राजकीय परिस्थितीनुसार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आखलेला हा चक्रव्यूह रणजितसिंह नाईक निंबाळकर भेदणार की त्यांचा अभिमन्यू होणार?  याला त्यांचे स्वकीयच जबाबदार असणार? हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

क्रमश:…..


तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!