तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट!
पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट!
लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!
फलटण: फलटण प्रांत अधिकारी यांच्या नावाने नांदल येथील विकास तोडकर या खाजगी एजंटाने तालुक्यातील एका शेतकऱ्याचे काम करतो म्हणून 50,000 रु.लाच घेताना सातारा अँटि करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न पुढे उपस्थित होत आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचे काम हे ओळख नसल्याने होत नाही. सततचे ग्रामीण भागातून फलटणला हेलपाटे मारावे लागत असतात. अशा लोकांना हेरून हे खाजगी एजंट तुमचे पुढील अधिकाऱ्याचे कडून काम करून देतो म्हणून लाखो रुपये,हजारो रुपये उकळत असतात.
अधिकाऱ्यांनाही आपले भिंग फुटत नाही म्हणून हे एजंट लोक हवेहवेसे असतात. यामुळे प्रशासनाची अब्रू वेशीला टांगले असून सर्व सामान्यांचे कामे होतील का हा प्रश्न आता पडू लागला आहे.
हे खाजगी एजंट लोक राजकीय पक्षांचे, संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येत असतात. अधिकारीही ही मग अशा लोकांना जवळ करत असतात. जेणेकरून त्यांचेही आर्थिक फायदा व्हावा.आता यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज उठणे गरजेचे आहे.








