टाकळवाडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजे गटाचे निष्ठावंत अजित डांबे तर उपाध्यक्षपदी यास्मिन आरिफ शेख यांची निवड


टाकळवाडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजे गटाचे निष्ठावंत अजित डांबे तर उपाध्यक्षपदी यास्मिन आरिफ शेख यांची निवड

 

फलटण: टाकळवाडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजे गटाचे निष्ठावंत अजित डांबे तर उपाध्यक्षपदी यास्मिन आरिफ शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

 

 

शाळेचे मुख्याध्यापक श्री. धाईंजे यांनी जुनी समिती कार्यकारणी मुदत संपल्याने नवीन कार्यकारणी निवडीसाठी आज मंगळवार दिनांक एक सप्टेंबर रोजी 2026 रोजी पालक मीटिंग आयोजित केली होती.

 

यावेळी पालकांमधून सदस्य निवडण्यात आले. व या सदस्यांमधून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष म्हणून राजे गटाचे निष्ठावंत श्री अजित डांबे व उपाध्यक्षपदी यास्मिन आरिफ शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालकांची मीटिंग ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामस्थांमधून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन होत आहे.


31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!