फलटणला राष्ट्रवादीचे दोन आमदार! एक शिवसेनेबरोबर तर दुसरे भाजप बरोबर  एकेकाळी फलटण पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता असलेल्या पक्षाच्या वाताहतीला जबाबदार कोण?


फलटणला राष्ट्रवादीचे दोन आमदार!

एक शिवसेनेबरोबर तर दुसरे भाजप बरोबर

एकेकाळी फलटण पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता असलेल्या पक्षाच्या वाताहतीला जबाबदार कोण?

जिल्हा परिषद व पंचायत समिती विश्लेषण भाग – 2

फलटण: विशेष संपादकीय लेख (अमोल पवार): फलटण तालुक्याला दोन आमदार लाभलेले आहेत. दोन्ही आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत.

 

यापैकी एक म्हणजे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषदेचे सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

 

तर दुसरे राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे फलटण कोरेगाव मतदार संघाचे विधानसभेचे सदस्य आमदार श्री.सचिन पाटील होत.

 

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागलेल्या असल्याने फलटण मध्ये राजकीय रणांगण सुरु झाले आहे.

 

सध्या राजकीय परिस्थितीनुसार शिवसेना व भारतीय जनता पार्टी मध्ये राजकीय रणसंग्राम सुरु झालेला असून.फलटणचे या दोन्ही आमदारांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली ताकत ही शिवसेनेच्या बाजूने उभी केली आहे.

 

तर आमदार सचिन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपली ताकत उभी केलेली आहे.या बदल्यात 2 जिल्हा परिषद सदस्य व 4 पंचायत समिती सदस्य यांना घड्याळाच्या चिन्हावर उभे केले आहे.

 

एकेकाळी फलटण तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. सद्य परिस्थितीत फलटणला 2 राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तरीसुध्दा राष्ट्रवादी पक्ष व संघटना ही आज दुसऱ्या पक्षांच्या दावणीला बांधलेली दिसून येत आहे.याला जबाबदार कोण? अजित दादांचे काही निर्णय चुकलेत का? हा प्रश्न राष्ट्रवादी प्रेमी मतदारांना पडलेला आहे. फलटण पंचायत समितीवर या पक्षाची सत्ता व सभापती होता. फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाची वाताहात याला जबाबदार कोण?

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या गोष्टी माहिती आहेत का? यावर अजित पवार आगामी काळात पक्ष वाढीसाठी काय उतारा काढणार? की पक्षाला तालुक्यात अशीच उतरती कळा लागणार? हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रमशः…..


तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!