शिरवळ जिल्हा गटात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप माने यांना मिळतोय जनतेचा जोरदार प्रतिसाद
सातारा : सातारा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण जोरदार तापलेले असून यामध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार प्रदीप माने यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
शिवसेनेचे उमेदवार प्रदीप माने यांचा जनतेशी थेट असलेला संवाद हा त्यांना प्रचारात उपयोगी पडत असून त्यांनी केलेल्या सामाजिक कामांच्या जोरावरती, व सर्वसामान्य जनतेसाठी सुखदुःखात धावून जाण्याच्या स्वभावाने लोकांना हा आपला हक्काचा उमेदवार वाटत आहे. शिरवळ जिल्हा परिषद गटातील रस्ते ,पाणीपुरवठा ,आरोग्य, शिक्षण सुविधा यावर भरीव काम करण्यासाठी ते कटिबद्ध असून त्यांना सातारा जिल्ह्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली व पालकमंत्री शंभूराजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करण्यासाठी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळालेली असून त्यांना प्रचार दरम्यान गाव भेटीदरम्यान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.









