फलटणमध्ये चायना मांजामुळे नागरिकांच्या जीविताला धोका; विक्री व वापरावर कडक कारवाई करा! भारतीय युवा पँथर संघटनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन!

फलटणमध्ये चायना मांजामुळे जीविताला धोका; विक्री व वापरावर कडक कारवाई करा!

भारतीय युवा पँथर संघटनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन

फलटण : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायना मांजामुळे नागरिकांच्या जीविताला तसेच पशू-पक्ष्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे चायना मांजाच्या वापरासह विक्रीवरही तातडीने बंदी घालून विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय युवा पॅन्थर सामाजिक संघटना, फलटण यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, चायना मांजामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच अनेक पशू-पक्षी जखमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चायना मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची योग्य तपासणी करून, विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

नागपंचमीसह सण उत्साहात साजरे करावेत; मात्र कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सण साजरे करू नयेत. नागरिकांची तसेच पशू-पक्ष्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने चायना मांजाविरोधात विशेष मोहीम राबवावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.

या मोहिमेत भारतीय युवा पॅन्थर सामाजिक संघटना प्रशासनासोबत सहभागी होऊन जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करणार असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेच्या मंगलताई जाधव (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी) सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई कचरे, मनीषाताई मोरे ,मंजू ताई भंडारे,सुषमा पवार, पूजा जाधव, कुंदाताई चौधरी, उषा भोसले, सुरेखा जाधव, शुभांगी ताई ओतारी पुनम ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!