फलटणमध्ये व्यवसायिकांनी घरगुती गॅस वापरण्याविरुद्ध प्रशासनाची कारवाई!
13 सिलेंडर केले जप्त.प्रशासन अलर्ट मोडवर.
फलटण: इराण इजराइल युद्धामुळे संपूर्ण देशभरात गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे नागरिकांना गॅस वापराचे प्रथम प्राधान्य दिले आहे. तरी फलटण तालुक्यात अनेक व्यवसायिकांनी गॅसचा साठा केला होता.अशा तक्रारी आल्यानंतर फलटण नियंत्रण कक्षातून व्यवसायिकांवरती कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण-2026/प्र.क्र.35/ नापु-27 08 मार्च 2026 अन्वये सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील इंधन पुरवठा साखळीवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय, सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण तहसील व पुरवठा विभागातर्फे फलटण तालुक्यात भरारी तपासणी पथक स्थापन करणेत आलेले आहे. सदर पथकाद्वारे हॉटेल आस्थापन, चहाचे स्टॉल, यांची पथकाव्दारे अचानक तपासणी करणेत येत आहे. त्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करत असतील त्यांच्या विरुध्द जीवनावश्यक कायदा 1955 अन्वये कलम 3 व 7 नुसार कार्यवाही करणेत येईल याबाबत सुचना देण्यात आलेली होती.
त्याअनुषंगाने आज दि. 16/03/2026 रोजी कोळकी व फलटण शहरात अचानक धाडी टाकून 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करणेत आले.
सदरची अचानक धाड ही कारवाई फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरिक्षण अधिकारी फलटण श्री.नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ,पुरवठा निरिक्षक फलटण अश्विनी पोहरे, पुरवठा लिपीक अनिकेत केकाण, किरण चवरे,शिपाई ओंकार गवारी यांचे सहकार्य लाभाले.









