भारतीय जनता पार्टीने नैतिकता सोडली ? राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेला उमेदवार पंचायत समिती सभापती!तरी ही भाजपचा सभापती झाला म्हणून तालुक्यात टिमकी!


भारतीय जनता पार्टीने नैतिकता सोडली ?

 

राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेला उमेदवार पंचायत समिती सभापती!तरी ही भाजपचा सभापती झाला म्हणून तालुक्यात टिमकी!

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांचे राजीनामास्त्र.

फलटण: फलटण तालुक्यामध्ये आज पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडी या बिनविरोध झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवार शिवांजली विक्रम भोसले या आज फलटण पंचायत समितीच्या बिनविरोध सभापती झाल्या आहेत. तर शिवसेनेचे अमोल सस्ते हे बिनविरोध उपसभापती झाले आहेत. या घटनेच्या पाठीमागे पडद्यामागे बऱ्याचश्या राजकीय हालचाली झाल्याच्या दिसून येत आहेत ते काही दिवसात जनतेच्या समोर येईलच.

 

परंतु आज जे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या शिवांजली विक्रम भोसले या उमेदवार फलटण पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत.त्यांचा भाजप मध्ये प्रवेश झाला आहे. व त्यांना धरून तीन ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा भाजप मध्ये प्रवेश झालेला आहे.असे बोलले जात आहे. परंतु तीनही उमेदवारांचा अधिकृत भाजप प्रवेश झाल्याचे फोटो दिसून येत नाहीत. किंवा निवडून आलेला उमेदवार ही मी भाजपची आहे असे म्हणताना कुठे ही दिसून येत नाही. निवडून आलेल्या सभापतींच्या वडिलांनी भाजप प्रवेश केलेला आहे. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल आहेत. परंतु स्वतः पंचायत समिती सभापती यांचा भाजप प्रवेश छायाचित्र,व्हिडिओ दिसून येत नाही. या राड्यातच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 

अशातच भारतीय जनता पार्टीने नैतिकता सोडून देऊन सभापती झालेले व्यक्तिमत्व हे भारतीय जनता पार्टीचे आहे.ही फलटण तालुक्यात टिमकी मारायला सुरुवात केली आहे. हे नैतिकतेला धरून योग्य नाही. ज्या अजित पवारांचे अपघाती निधन झाले. त्यांच्याविषयी सगळीकडे सहानुभूती असताना त्यांचे पक्षाविषयी अशी भूमिका का घेतली गेली?हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

तसेच असे जर असेल की राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असेल तर त्यांच्यावर राष्ट्रवादी वरिष्ठ पातळीवरून पक्ष शिस्त भंगाची कारवाई होणार का? या तीनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होणार का?त्या ठिकाणी पुन्हा पोट निवडणुका लागणार का? याची उत्तरे ही आगामी काळात मिळतील का हे पाहावे लागणार आहे. तोपर्यंत…

क्रमशा….. भाग -1


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!