फलटण येथे पंचायत समिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा


फलटण येथे पंचायत समिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

 

फलटण: एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण दोन अंतर्गत महिला दिन निमित्ताने कार्यक्रम दिनांक 18 मार्च 2026 रोजी अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित केला गेला.

 

सदर कार्यक्रमांतर्गत सकाळी आठ वाजता महिला बाईक रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान लेक लाडकी योजना ,बेटी बचाव बेटी पढाव ,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व आयसीडीएसच्या सेवांबद्दल जनजागृती करण्यात आली.

 

तदनंतर सदर कार्यक्रमांमध्ये तालुक्यातील प्रगतशील शेतकरी

आदर्श गृहिणी व एक जबाबदार महिला कुटुंबप्रमुख असे तीन पुरस्कार देण्यात आले.

 

तसेच आदर्श पर्यवेक्षिका व आदर्श सेविका व मदतनीस असे देखील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या उस्फुर्त सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

 

सदर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण दोनच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी मॅडम यांनी केले असून सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती फलटणच्या नवनिर्वाचित सभापती कुमारी शिवांजली भोसले तसेच पंचायत समिती सदस्य विकास नाळे, सचिन अभंग, सीमा भोईटे , वनिता आढाव, योगिता गायकवाड, श्रीमती आटोळे यादेखील उपस्थित होत्या.कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड.जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यादेखील उपस्थित होत्या.

 

सर्व उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पुरस्काराचे वितरण करून आपले अनमोल मार्गदर्शन दिले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी कुमारी प्रियांका हरिश्चंद्र गवळी मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे आभार श्रीमती कोमल फुले यांनी मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्या कांबळे यांनी केले.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!