सौ.प्रियांका प्रशांत इवरे यांची सहाय्यक नगर रचनाकार,श्रेणी 1,गट-ब (राजपत्रित) नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन अधिकारी पदी निवड
फलटण: टाकळवाडे तालुका फलटण येथील सौ.प्रियांका प्रशांत इवरे यांची सहाय्यक नगर रचनाकार,श्रेणी 1,गट-ब (राजपत्रित) नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन अधिकारी पदी निवड झाली आहे.
त्या सध्या जामखेड येथे उपअभियंता या पदावर कार्यरत असुन वर्षभरात त्यांनी दुसरे उज्वल यश मिळवले आहे.
प्रियांका या प्रशांत इवरे यांच्या पत्नी असुन डाॅ. शिवाजी विश्वनाथ गावडे रा.गुणवडी ता. बारामती यांच्या त्या कन्या तर माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव इवरे यांच्या सुनबाई आहेत. तसेच शिवसेना तालुका प्रमुख नानासो इवरे यांच्या धाकट्या वहिनी आहेत.
इवरे परिवारात उच्चपदस्थ अधिकारी पदी जाणाऱ्या त्या पहिल्या अधीकारी असल्याने इवरे परिवारात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडी बद्दल त्यांचे नातेवाईक, टाकळवाडे ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.









