राजाळे येथे डीजे मुक्त साधेपणाने शिवजयंती साजरी
सर्व जाती धर्म समावेशक जयंती साजरी करून जयंती मंडळाने शिवरायांचे विचार जोपासले! सर्व स्तरातून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक
फलटण: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा श्री .जानाई शिवजयंती उत्सव मंडळ राजाळे यांनी आयोजित केला होता.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माचे मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केले त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती उत्सव श्री.जानाई शिवजयंती उत्सव मंडळ दरवर्षी साजरा करत आहे.
यावेळी जानाई मंदिरातून ज्योत आणून सर्व ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन सर्वच समाजातील जाती धर्मातील सर्व लोकांना बरोबर घेऊन जयंती साजरी केली गेली .डॉल्बी डीजे विरहित साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बाळासो भालेराव,सोसायटी माजी चेअरमन लालासो भोईटे ,जगन्नाथ पवार, हाजी भाई, महावीर भालेराव, रामभाऊ निंबाळकर, सचिन भालेराव, संदीप भोईटे, विजय सिंह निंबाळकर, साहिल भालेराव,संतोष कुंभार, महेश भालेराव, गणेश कांबळे, रोहन निंबाळकर, अथर्व तोरसे, अक्षय शेडगे, सूर्यकांत भालेराव, शरद कुचेकर, बापूराव मुळीक, अण्णा सावंत यांनी अभिवादन केले.









