राजाळे येथील डॉ.चंदाताई निमकर ॲग्रोवन राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित

राजाळे येथील डॉ.चंदाताई निमकर ॲग्रोवन राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित

फलटण: राजाळे ता.फलटण येथील डॉ.चंदाताई निमकर यांना नुकताच ॲग्रोवन राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली 1990 च्या सुमारास त्यांनी कामास सुरुवात केली. स्थानिक शेळ्या व मेंढ्या ह्या ग्रामीण गरिबांच्या आयुष्यात महत्वाच्या पशुच्या आनुवंशिक सुधारणेतून उत्पादनवाढीसाठी त्यांनी अव्याहत कार्य केले ते अजूनही चालू आहे. ‘नारी सुवर्णा’ ही जुळी कोकरे देणारी मेंढीची जात डॉ. निंबकर व डॉ.प्रदिप घळसासी यांच्या नेतृत्वाखाली विकसित केली गेली. तिचा फायदा आता महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो मेंढपाळांना होत आहे. त्यांच्या उत्पन्नात या मेंढीमुळे 30 ते 60% वाढ झाली आहे.

फलटण येथील ‘नारी’ संस्थेचा पशुसंवर्धन विभाग हा शेळी मेंढी विषयक वैज्ञानिक विकास व प्रसारात आघाडीवर आहे. शेळ्यांमधील समूह आधारित पैदास कार्यक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण ह्या क्षेत्रात त्या गेली काही वर्षे कार्यरत आहेत.त्यांच्या संशोधनात्मक व इतर कार्यासाठी त्या देश व परदेशात आदराने ओळखल्या जातात.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!