सोनगाव(बंगला) येथील अजित पिंगळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड खात्याअंतर्गत स्पर्धा परीक्षेतून निवड


सोनगाव(बंगला) येथील अजित पिंगळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

खात्याअंतर्गत स्पर्धा परीक्षेतून निवड

फलटण: फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले श्री.अजित महादेव पिंगळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत.

अजित पिंगळे हे सोनगाव तालुका फलटण येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.

 

यापूर्वी त्यांनी सातारा पोलिस मुख्यालय, कोरेगाव पोलिस ठाणे येथे सेवा केली आहे. सध्या ते फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करत आहेत.

 

या निवडीबद्दल त्यांचा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, बरड पोलीस दूर क्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, डीबी विभाग प्रमुख पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांनी सत्कार केला.

 

या निवडीबद्दल त्यांचे सोनगाव ग्रामस्थ, पोलीस खात्यातील मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!