राजाळे ग्रामपंचायतचा वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रम! गावातील मयत व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ व वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याच्या उपक्रमाची सुरुवात


राजाळे ग्रामपंचायतचा वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रम

गावातील मयत व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ व वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याच्या उपक्रमाची सुरुवात

 

फलटण: ग्रामपंचायत राजाळे ता.फलटण यांनी नियोजित केल्याप्रमाणे, श्रीमती गंगुबाई हनुमंतराव महिपाल यांच्या वैकुंठगमणानंतर आज दिनांक १६ जून २०२६ रोजी त्यांच्या सावडण्याच्या दिवशी त्यांच्या कुटुंबीयांनी स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्या स्मृती निरंतर स्मरणात राहण्यासाठी स्मशानभूमी जवळ दोन झाडे लावली.

 

याशिवाय या महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते, त्यांचेसाठी समाजसेवक जयवंतराव(अण्णा) भोसले प्रतिष्ठान यांच्यामार्फत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी शेजारी एकूण २५ झाडे नियोजनबद्ध पद्धतीने लावली आणि त्यास पाणी देखील दिले.. याशिवाय जानाई मंदिराच्या समोरील,स्टॅन्ड वरील झाडांना तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या सर्वच झाडांना पाणी घातले

*१. राजाळे ग्रामस्थ व युवा पिढीतील तरुण/तरुणींचे निसर्गाशी नाते जोडण्यासाठी वृक्षलागवड करून निसर्ग संपत्तीचे त्यांनी पुढील पिढीसाठी संवर्धन करावे..! यासाठी आपल्या वाढदिवशी कट आउट लावणे, केक कापणे किंवा फटाके फोडणे यापेक्षा आपल्या वाढदिवसाच्या वर्षाइतकी झाडे लावण्याचा त्यांनी प्रयत्न करावा..!*

*२. याशिवाय श्रद्धेपोटी, आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्तीस देवाज्ञा झाल्यानंतर, त्या व्यक्तीच्या सावडणे विधीच्या कार्यक्रम प्रसंगी, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक दीर्घायुषी झाडाचे रोप ट्री-गार्ड सहीत लावावे.. (उदा.वड ,पिंपळ, पिंपरण, कडुनिंब, करंज, चिंच, आंबा, कदंबा, जांभूळ, बकुळ इ.)*

*३. यावेळी आपण संपूर्ण रक्षा नदीमध्ये विसर्जित करतो. मात्र त्यातीलच काही रक्षा या लावलेल्या झाडांच्या बुडाशी टाकावी. म्हणजे भविष्यात याचा वटवृक्ष तयार होईल, तेव्हा दैनंदिन जीवनात कुटुंबातील आपल्या व्यक्तीची आठवण राहील.. जेव्हा केव्हा हा वृक्ष दृष्टीस पडेल किंवा त्या वृक्षाच्या सावलीखाली येऊ, तेव्हा शेकडो वर्षापर्यंत त्या व्यक्तीच्या स्मृती झाडाच्या रूपाने जिवंत राहतील.. तसेच आपल्या व्यक्तीचे झाडाच्या माध्यमातून निरंतर योगदान राहील..हिच आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृती जागवणारी आणि निसर्गवृद्धीसह त्यांना दीर्घकालीन श्रद्धांजली ठरेल..!*

४. वृक्ष लागवडीसाठी गावच्या हद्दीमधील व गावठाणातील रस्ते किंवा आपल्या शेतीमध्ये किंवा राहत्या घरासमोरील परिसरात वृक्ष लागवड करून संतांच्या विचाराला व वसुंधरेला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

वसुंधरेची म्हणजे या धरणीमातेची सेवा करून, तिच्यावर अवलंबून असणाऱ्या असंख्य प्राणिमात्रांना दिलासा मिळेल म्हणून भविष्यकाळाचा वेध घेऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी जी योजना मांडली त्याबाबत आदरणीय शेडगे सरांचे स्वागत आहे..! गावासाठी व गावातील पुढच्या पिढीसाठी या योजनेचा निश्चित फायदा होणार असून यास कमीत कमी लाईक तरी करावे किंवा यामध्ये काही दुरुस्ती असेल तर सुचवल्यास त्या बाबींचे स्वागत करता येईल..!


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!