वारकऱ्यांसाठी अडचणी ठरू पाहणारे ते मेनहोल अखेर झाकले गेले!
प्रशासनाच्यावतीने फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांची तत्परता; Ap न्यूजच्या बातमीची दखल व कौतुक!
या पूर्वीची बातमी..
पुणे पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यात मेनहोल उघडी,वारकऱ्यांच्या अपघाताची शक्यता!
प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी!
वारीच्या वाटेवर: भाग -1
फलटण: फलटण तालुक्यातील असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील रस्त्याच्या साईटच्या गटार लाइनवरील मेनहोल उघडी असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या हॉटेल जाई विडणी येथून पुढे फलटण कडे येताना साईटला ही 2मेनहोल उघडे दिसत आहेत.ती ही बंद करण्यात यावेत. जेणे करून इथून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांचा रात्री अपरात्री अपघात होऊ नये.
तसेच तालुक्यातील रोडसाइटवरील प्रत्येक ठिकाणाचे संबंधितांकडून पाहणी करून तशी मेनहोल आढळल्यास ती बंद करण्यात यावीत. याविषयी प्रशासनाने लक्ष द्यावे.
अशी बातमी केली असता फलटणचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी Ap न्यूजच्या बातमीची दखल घेऊन त्या ठिकाणी असणारे मेनहोल बंद करायला लावले आहेत. जेणेकरून भविष्यात वारकऱ्यांविषयी कोणतीही दुर्घटना होऊ नये. याबद्दल तहसीलदारांचे व Ap न्यूजचे सुजान नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.









