सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र फलटण यांच्याकडून देशी वृक्षांचे वाटप! शासकीय विभाग यांना मोफत,शाळा महाविद्यालय यांना प्रति रोप 1 रुपया नाममात्र दर! – श्री.विजय रामटेके वनक्षेत्रपाल फलटण 


सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र फलटण यांच्याकडून देशी वृक्षांचे वाटप!

 

शासकीय विभाग यांना मोफत,शाळा महाविद्यालय यांना प्रति रोप 1 रुपया नाममात्र दर! – श्री.विजय रामटेके वनक्षेत्रपाल फलटण

 

फलटण: फलटण येथील माळजाई उद्यानासमोरील असणाऱ्या सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र फलटण यांच्यावतीने चिंच, पेरू जांभूळ, कवट ,करंजा, वड,पिंपळ अशा देशी झाडांच्या रोपाचे वन महोत्सवांतर्गत वाटप सुरू आहे.

 

यामध्ये शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, ग्रामपंचायत ,पंचायत समिती पोलीस दल केंद्र शासनाचे संरक्षण दल यांना रोपे मोफत देण्यात येत असून. शाळा महाविद्यालयांना प्रतिरोप एक रुपया दर, आणि इतर सर्वसामान्य व्यक्तींना अठरा रुपये प्रतिरोप असा दर दिला आहे.

 

वृक्ष वाटप प्रसंगी वनक्षेत्रपाल विजय रामटेके, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दीपक सोरट,वनसेवक बाळासो धालपे, यांचे उपस्थिती होती. जास्तीत जास्त लोकांनी झाडे घेऊन लावावीत असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे वतीने करण्यात येत आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!