सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज तरडगाव प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न
फलटण:आज बुधवार दि. _15 / 06/ २०२६ रोजी प्रशालेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या प्राचार्या सौ. काकडे एस. जी. मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र घाडगे तसेच उपाध्यक्षा सौ.काटकर मॅडम व पर्यवेक्षक श्री निंबाळकर सर यांच्या हस्ते पालखीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. व नंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक वेश परिधान करून टाळ, मृदंग, वीणा यांच्या साथीने अभंग, हरिपाठ आणि नामस्मरण करत पालखीची तरडगाव मधून मिरवणूक काढली. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
प्रशालेतील छोट्या मुलांनी श्री संत ज्ञानेश्वर , श्री सोपान देव, श्री निवृत्तीनाथ, तसेच मुक्ताईची खूप छान वेशभूषा केली होती, सर्वच मुलांनी सुंदर वेशभूषा केल्यामुळे पालखीचा सोहळा अतिशय सुंदर झाला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संतांच्या जीवनावर आधारित मनोगते, अभंग गायन आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापकांनी संतांच्या विचारांचे महत्त्व आणि वारकरी परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री तांबे सर व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. सर्व महिला शिक्षकांनी विठ्ठल रुक्माई ची रांगोळी अतिशय सुंदर काढली. या पालखी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर निर्माण झाला. नंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र गाडगे यांनी विद्यार्थ्यांसाठी गोड बुंदी दिली होती . प्रशालीतील ज्येष्ठ शिक्षक श्री डांगे सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









