सभापती शिवांजली भोसले ऑन फील्ड; होळ ता.फलटण येथील ग्रामस्थांना मिळणार आता फिल्टरमधील स्वच्छ पाणी!
जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्र, शाळा, अंगणवाड्याची ही पाहणी करून सूचना!
फलटण: होळ तालुका फलटण येथे पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रम भोसले यांनी ग्रामस्थांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची फिल्टरच्या तक्रारीची प्रत्यक्ष पाहणी करून तो प्रश्न सोडवला आहे. आता यापुढे ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे.
तसेच होळ गावातील आरोग्य केंद्र शाळा, अंगणवाड्या येथील स्वच्छतेची पाहणी करून सूचना करण्यात आला. विद्यार्थ्यांबरोबर गप्पागोष्टी करून त्यांच्याबरोबर रमून गेल्या.
यावेळी ग्रामसेवक श्री.दडस, अंगणवाडी सेविका, रुग्णालयातील कर्मचारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Views: 3








