टाकळवाडे येथील महादेव मंदिर जीर्णोध्दार व कलशरोहन सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न
फलटण: टाकळवाडे तालुका फलटण येथील प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोध्दार व कलशरोहन सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने लोक वर्गणीतून करण्यात आले होते. यावेळी होम हवन बालब्रह्मचारी योगेशगिरी हनुमंतगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे कलश पूजन विधान परिषदेचे माजी सभापती , आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तर महाआरती निमजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामसाहेब निंबाळकर व माजी आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.
दिवसभर लोकांना महाप्रसाद वाटण्यात आला व सायंकाळी वडले येथील भजनी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम झाला.
Views: 3








