फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेना राजे गटाचे डॉ.किरण उत्तमराव शेंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा! विडणी भागात डॅमेज कंट्रोलसाठी राजे गटाची व्यूहरचना?


फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेना राजे गटाचे डॉ.किरण उत्तमराव शेंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

 

विडणी भागात डॅमेज कंट्रोलसाठी राजे गटाची व्यूहरचना?

फलटण: आगामी येऊ घातलेल्या फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेना राजे गटाकडून विडणी येथील डॉ. किरण उत्तमराव शेंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजे गटाच्या गोटात सुरू आहे.

 

विडणी ग्रामपंचायतची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजेगट डॉ. किरण शेंडे यांना पंचायत समिती स्वीकृत सदस्य पद देऊन त्यांना ताकद देऊन व्यूह रचना आखत आहे का? विडणी गणात व गावात वाढलेली भाजपची ताकद यावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी असे राजे गटाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.


31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!