मुंजवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची दुरावस्था!
सामाजिक कार्यकर्ते गंगाराम रणदिवे यांचे फलटण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांना निवेदन
फलटण: गंगाराम अरुण रणदिवे सरचिटणीस युवक काँग्रेस कमिटी, सातारा मु.पो. मुंजवडी ता. फलटण जि. सातारा ४१५५२३ मोबाईल नं. ९९७५३४२६६२ यांनी मा. गटविकास अधिकारीसाो. पंचायत समिती, फलटण यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मौजे मुंजवडी ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे या गांवात असून, हे व्यापारी संकुल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल मुंजवडी ता. फलटण या नामे सुरु आहे. या व्यापारी संकुलाच्या नाम फलकाची दुरावस्था झाले कारणाने मी मौजे मुंजवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना दि. २५/०२/२०२३ रोजी पत्रव्यवहार केला होता. तद्नंतर आजतागायत या व्यापारी संकुलाचा नामफलक ग्रामपंचायतीने बसविलेला नाही. या बाबतीत मी अनेक वेळा समक्ष ग्रामसेवक आणि ग्रामसभेत या बाबत विचारणा केली आहे. परंतु आज अखेर या वरती ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही
सबब, या पत्राद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की, सद्यस्थितीत मौजे ग्रामपंचायत मुंजवडी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल मुंजवडी ता. फलटण या व्यापारी संकुलाची खुपच दुरावस्था झालेली आहे. यामध्ये एका गाळयाचे पत्र्याचे छत पूर्णपणे गंजले असून त्याचे पूर्ण तुकडे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे या व्यापारी संकुलाची लवकरात लवकर दुरुस्ती आणि रंगरंगोटी करुन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल मुंजवडी ता. फलटण या नावाचा डिजिटल फलक त्वरीत बसविण्याच्या कडक सूचना आपले स्तरावरुन ग्रामपंचायतेस देण्यात याव्यात.
या बाबत सकारात्मक कार्यवाही न झालेस मी दि. ०१/१०/२०२६ पासून याच व्यापारी संकुलाच्या समोर उपोषणास बसणार आहे. याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी प्रत
१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारीसाो, सातारा जिल्हा परिषद, सातारा.








