सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.पांडुरंग बाजीराव पवार यांचा रविवार दि.20 सप्टेंबर रोजी 75 वा अमृत महोत्सव समारंभ
प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान
फलटण: सरस्वती शिक्षण संस्था व प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटण व गुणवरेचे संस्थापक श्री पांडुरंग बाजीराव पवार यांचा रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी चार वाजता अनंत मंगल कार्यालय फलटण येथे 75 वाढदिवस व अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी जीवनाचे वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.विशाल पांडुरंग पवार व समस्त पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Views: 8








