अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांच्या जोरदार प्रतिसादासह संपन्न!
फलटण: अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे ता.फलटण यांच्यावतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी रात्री आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सौ.प्रज्ञा अजित डांबे प्रथम क्रमांक मानाची पैठणी, सौ.पायल अमोल पवार द्वितीय क्रमांक सिलिंग फॅन, हसीना सलीम शेख तृतीय क्रमांक – इस्त्री, उत्तेजनार्थ म्हणून गावडे मॅडम,साजन मुजावर, कविता गवळी यांना बक्षीस देण्यात आले.
तर सर्व महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला होता. यामध्ये पुष्पा मोहन डांबे, लिलाबाई पवार यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघल्या त्यांना ही भेटवस्तू देण्यात आला भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व विजेत्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून आनंद पवार सर आसू यांनी काम पाहिले.
यावेळी अजिंक्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.








