गौरी गणपती सजावटीतून बळीराजाला अनोखी मानवंदना; शेतकरी जगाचा पोशिंदा! गिरवीच्या भक्ती जाधवच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक!


गौरी गणपती सजावटीतून बळीराजाला अनोखी मानवंदना; शेतकरी जगाचा पोशिंदा!

गिरवीच्या भक्ती जाधवच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक!

 

*गिरवी, ता. फलटण (जि. सातारा) -* गौरी गणपती उत्सवात इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने साकारलेल्या शेतीच्या हुबेहूब देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतात राबणारे शेतकरी, झोपडी, विहीर आणि शेतीच्या विविध अवजारांचा समावेश असलेले आकर्षक फार्म मॉडेल तयार करून तिने शेतकरी राजाला अनोखी मानवंदना दिली आहे.

 

गिरवी गावची रहिवासी *कु. भक्ती महेंद्र जाधव* हिने ही कल्पक सजावट केली आहे. तिला तिचे वडील *डॉ. महेंद्र जाधव* यांची मोलाची मदत लाभली असून *प्रा. डॉ. आशिष जाधव* यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

या देखाव्यात शेतात काम करणारे शेतकरी, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी, धान्य कापणी करणाऱ्या महिला, गवत आणि मातीची सुंदर झोपडी, दगडांनी बांधलेली विहीर व रहाट, तसेच नांगर, विळा, कोयता, खुरपे, टोपली यासारखी शेतकऱ्यांची पारंपरिक अवजारे अत्यंत बारकाईने मांडण्यात आली आहेत. हिरवीगार शेती, शेतातील पीक आणि मातीचा सुगंध यामुळे देखावा अगदी जिवंत वाटत आहे.

 

> “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचे कष्ट, त्याचे जीवन सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने मी हा शेतीचा देखावा तयार केला. यासाठी माझ्या वडिलांनी मला खूप मदत केली,” असे कु. भक्ती जाधव हिने सांगितले.

 

आधुनिक व डीजे सजावटीच्या काळात भक्तीने जपलेली शेती संस्कृती आणि तिची कल्पकता विशेष कौतुकास्पद ठरत आहे. तिचा हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

33
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!