गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना १०% लाभांश जाहीर!
सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेची यशस्वी वाटचाल- चेअरमन श्री.सचिन यादव
फलटण : सभासदांचा दृढ विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि अधिकारीवर्गाच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणने आर्थिक प्रगतीची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेच्या या प्रगतीचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचविताना चालू आर्थिक वर्षासाठी सभासदांना १०% लाभांश (डिव्हिडंड) वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे संस्थेला या वर्षी ही ऑडिट ‘अ’ वर्ग प्राप्त झाले आहे.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन यादव यांनी सांगितले की, संस्थेच्या एकूण ५ शाखा कार्यरत असून संस्थेने १०० कोटी ठेवी संकलित केल्या आहेत. तसेच सभासदांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ₹५५ कोटी कर्ज वाटप करण्यात आले असून संस्थेचा एकत्रित व्यतसाग ११२५ कोटींवर पोहोचला आहे.
संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासदांना अधिक गतिमान आणि सुलभ सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल
करीत आहे. संस्थेमध्ये गोल्ड टेस्टिंग मशीन, मोबाईल बैंकिंग आणि डिजिटल पिग्मी यांसारख्या आधुनिक सुविधांचा वापर करून व्यवसाय चालू शकतो व ती काळाची गरज ओळखून त्याची सुविधा ग्राहकांना देत असल्याचे चेअरमन श्री. सचिन यादव यांनी सांगितले
संस्थेने पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आत्मसात करून शाखा विस्तार व नवीन तालुका कार्यक्षेत्र असणारी गॅलेक्सी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बारामती या ठिकाणी अदयावत शाखा स्थापन केली. एवढ्या वरतीच न थांबता गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची देखिल अथक प्रयत्नातून केंद्र सरकारकडून परवानगी मिळविली व सदरील अदयावत शाखा फलटण नगरीमध्ये सुरू करण्यात आली.
सर्व गॅलेक्सी ग्रुप ऑफ संस्थेच्या ठेवी ₹१०० कोटींच्या जवळपास आहेत व लोकांच्या प्रतिसादामुळे लवकरच संस्था महाराष्ट्र व कर्नाटकात नावलौकिक होईल असे मत संचालक श्री. गणेश निकम यांनी यावेळी नमूद केले.








