फलटण वनविभागाच्याकडून ऐन उन्हाळ्यात झाडांची कत्तल! फलटण वनविभागाकडून झाडे लावा, झाडे तोडा अभियानाची सुरुवात! भाग -1

फलटण वनविभागाच्याकडून ऐन उन्हाळ्यात झाडांची कत्तल!

फलटण वनविभागाकडून झाडे लावा, झाडे तोडा अभियानाची सुरुवात!

भाग -1

फलटण – फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून 4 एकर परिसरात देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. कालांतराने ही झाडे चांगली वाढून परिसर हिरवागार झाला होता.मात्र, अलीकडेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेसीबी लावून झाडांची तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

ही माहिती समजताच घटनास्थळी भेट दिली असता, परिसरातील अनेक झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले.

घटनास्थळावरील काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,या ठिकाणी कोणता तरी नवीन प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकल्पासाठीच झाडांची तोड करण्यात आली का, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वन विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. त्यातील अनेक झाडे टिकत नाहीत, मात्र काही झाडे मोठी होऊन पर्यावरणासाठी महत्त्वाची ठरतात. फलटण येथील ही झाडेही चांगली वाढलेली असून भविष्यात मोठ्या वृक्षांचे रूप धारण करण्याच्या मार्गावर होती. अशा परिस्थितीत त्यांची तोड का करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवीन प्रकल्पासाठी पर्यायी मोकळी जमीन उपलब्ध असताना वनक्षेत्रातील झाडांचीच निवड का करण्यात आली, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, झाडे तोडण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली होती का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

भारतामध्ये वनक्षेत्रातील झाडांची तोड ही Forest Conservation Act 1980 अंतर्गत नियंत्रित केली जाते. कोणत्याही प्रकल्पासाठी झाडे तोडताना आवश्यक मंजुरी घेणे बंधनकारक असते. तसेच Environment Protection Act 1986 नुसार पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. झाडे तोडल्यास त्याच्या बदल्यात प्रतिपूरक वृक्षारोपण (Compensatory Afforestation) करणेही अनिवार्य आहे.

सदर प्रकरणात किती झाडांची तोड झाली, त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, तसेच प्रतिपूरक वृक्षारोपणाची योजना काय आहे?, याबाबत वन विभागाने अधिकृत माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, एका बाजूला पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असताना, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे झाडांची तोड होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!