पिंपरी चिंचवड येथे कोयत्याने हल्ला करुन 3 लाख 80 हजाराची रोकड लुटणाऱ्यांना गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या


पिंपरी चिंचवड येथे कोयत्याने हल्ला करुन 3 लाख 80 हजाराची रोकड लुटणाऱ्यांना गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

 

  • पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : एका दुकान मालकावर कोयत्याने हल्ला करुन त्याच्या कडील रोख रक्कम लुटणाऱ्या इसमांना पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे या इसमांना मालकाकडे रोकड असल्याची टिप देणारा त्याचा कामगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी त्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

 

१) यश रमेश अंधारे (वय-१८ वर्ष, रा. अर्चनाताई बारणे घराच्या शेजारी, बोऱ्हाडे बिल्डींग, चांदणी चौक, थेरगाव गावठाण, मुळगाव- मु.पो. भोनजे, ता. बार्शी, जि. सोलापूर), २) रितेश मुकेश चव्हाण (वय- १८ वर्ष, रा. जगताप नगर, ४ व ५ थेरगाव), ३) रुपेद्र रुपबसंत बैद (वय- १९ वर्ष, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात एका विधी संघर्षीत बालकाला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हि घटना मंगळवार (ता.२ डिसेंबर 2025) रोजी रात्री पावने दहा वाजण्याच्या सुमारास केशवनगर, चिंचवड येथे घडली आहे.

 

पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड गावातील केशवनगर येथे श्रीजी सिरामिक दुकान येथे आशिष अरजनभा बुवा हे दुकान मालक थांबलेले असताना त्यांच्या वर अनोळखी चार इसमांनी हातातील हत्याराने वार करुन त्यांच्याकडील ३ लाख ८० हजार रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन नेली होती. दरम्यान, त्यांनी परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी हातातील हत्याराने लोकांना धमकावले देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी घटनास्थळी भेट दिली आणि तपासकामी वेगवेगळ्या टिम तयार करुन त्यांना सुचना दिल्या.

 

या गुन्ह्याचा तपास गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने हे आपल्या टिम सह तपास करीत असताना त्यांनी सी. सी. टि. व्ही. फूटेज व खास खबऱ्या मार्फत सदर अनोळखी इसमांपैकी नमुद तीन जणांना व एक विधी संर्घषीत बालक यांना थेरगाव गावठाण स्मशानभूमी जवळुन ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान गुन्हा केला असल्याची कबुली अटक आरोपींनी पोलीसांना दिली आहे. पुढील कारवाई साठी अटक आरोपींना चिंचवड पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलिस उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रविण कुमार तापकीर, सहायक पोलीस फौजदार ठोकळ, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, विजय तेलेवार, शाम बाबा, नितिन गेंगजे, रामदास मोहिते, विजय वेळापुरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख यांच्या


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!