सोनगाव बंगला येथील शेतकऱ्यांचा 3 एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे आगीत भस्मसात!
महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संक्रात! शेतकऱ्यांना वाली कोण?
फलटण: भगवान पंढरीनाथ जगदाळे व्यवसाय-शेती रा. सोनगाव बंगला ता. फलटण यांचे जबाबरून व ग्रामीण पोलीस ठाणे येथून आलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांचे सोनगाव बंगला ता. फलटण गावचे हद्दीत जमीन गट नं. 178 मध्ये पाऊण एकर ऊसाचे क्षेत्र असुन ऊस पिक सध्या 14 महिन्याचे होते
दिंनाक 15/10/2026 रोजी सायंकाळी 4.30 वा सुमारास मी राहते घरी असताना त्यावेळी मला आमचे सोनगाव बंगला ता. फलटण येथील बांधकरी लालासाहेब भगवान वाघमोडे यांचा फोन आला की, तुमच्या ऊसाला कशानेतरी आग लागली असुन तुमचा ऊस पेटत आहे. असा फोन आल्याने मी लगेच आमचे शेतात गेलो त्यावेळी तेथील ऊस जळु लागला होता. माझे शेतजमिनी शेजारी असणारे शेतजमिन मालक 1) ज्योती धनाजी मोरे 2) जागृती सचिन मोरे 3) गोरख महादेव लवटे 4) हरीभाऊ रामभाऊ पवार 5) प्रकाश मारुती वाघ सर्व रा. सोनगाव बंगला ता.फलटण हे सर्व तेथे आले तसेच गावातील इतर लोक ही तेथे आग बघुन आले होते.त्या आगीमध्ये सर्व शेतजमिनी मालकांच्या उसाला पाणी पाजण्याच्या प्लास्टीकच्या पाईप जळून नुकसान झाली आहे सदर आग विजवण्याचा मी, व माझे बांधकरी 1) ज्योती धनाजी मोरे 2) जागृती सचिन मोरे 3) गोरख महादेव लवटे 4) हरीभाऊ रामभाऊ पवार 5) प्रकाश मारुती वाघ व इतर लोकांनी आग विजण्याचा प्रयत्न केला परंतु आग अटोक्यात आली नाही त्यामुळे माझे पाऊण एकर व 1) ज्योती धनाजी मोरे जमिन गट. नं. 187 मधील अर्धा एकर 2) जागृती सचिन मोरे जमिन गट. नं. 187 अर्धा एकर 3) गोरख महादेव लवटे जमिन गट.नं. 187 अर्धा एकर 4) हरीभाऊ रामभाऊ पवार जमिन गट. नं. 184 एक एकर 5) प्रकाश मारुती वाघ जमिन गट. नं. 183 पाऊण एकर असे सर्वाचे ऊसाचे पिकाचे व ड्रीपच्या पाईपीचे जळुन नुकसान झाले आहे .त्यानंतर मी घरी आलो नंतर आज रोजी आम्ही सर्वजण चर्चा करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत सदर घटनेची माहिती देण्यास आलो आहे. सदरची आग ही शार्टसर्कीटमुळे झाली आहे तरी झाले जळीताचा तपास व्हावा.
ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








