दुष्काळी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा! जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचे आवाहन 


दुष्काळी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा!

 

जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचे आवाहन

 

फलटण: एल निनोच्या प्रभावामुळे चालू वर्षात सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून, पारंपरिक जलस्रोत आटत चालले आहेत. परिणामी ग्रामीण आणि नागरी भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः फलटण पूर्व भागातील, शंभू महादेव डोंगरी भागातील गावात परिस्थिती गंभीर होत असल्याची दिसून येत आहे.

 

 

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील नागरिकांनी पाणी बचतीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

 

 

ग्रामीण भागातील विहिरी, कालवे, नद्या आणि तलावांमधून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा टाळावा.टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती कामांसाठी करावा.

 

शेतकऱ्यांनी पारंपरिक सिंचन पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे नियोजन करावे, असे आवाहनही केले आहे.

 

 

“सध्याची परिस्थिती पाहता पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा.असे आवाहन बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सौ.वैशालीताई कांबळे यांनी केले आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!