गोखळी येथे स्वर्गीय राजेंद्रतात्या भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना १००० वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप! तात्यांच्या कृतिशील विचारांचा वारसा पुढेही सुरूच राहणार !


गोखळी येथे स्वर्गीय राजेंद्रतात्या भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना १,००० वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप!

तात्यांच्या कृतिशील विचारांचा वारसा पुढेही सुरूच राहणारा!

फलटण: माणूस आपल्या आयुष्यात किती जगला, यापेक्षा तो समाजासाठी किती जगला, हे अधिक महत्त्वाचे असते. शिक्षणासाठी केलेली मदत ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असते.”* 🙏

 

आज गोखळी येथे **स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त १००० वह्यांचे वाटप** करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम योगेश राजेंद्र भागवत, PSI रुपेश कुमार राजेंद्र भागवत, पुणे पोलीस निलेश राजेंद्र भागवत आणि शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, गोखळी यांच्या वतीने राबविण्यात आला.

 

या उपक्रमांतर्गत गोखळी व परिसरातील खालील शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

 

📚 **वह्यांचे वाटप करण्यात आलेल्या शाळा :**

१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोखळी गावठाण

२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंचबिघा

३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जगताप वस्ती

४. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाडगे वस्ती

५. जय हनुमान माध्यमिक विद्यालय, गोखळी

 

या कार्यक्रमाला गोखळी ग्रामपंचायतीचे मा. सरपंच रमेशदादा गावडे सवई, गोखळी गावचे सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मदने, त्रिंबक बाराते मामा, व्यसनमुक्ती युवक संघटना फलटण तालुकाध्यक्ष जितेंद्र नाना फरतडे, प्रहार संघटना फलटण तालुकाध्यक्ष सागर गावडे, गोखळी ग्रामपंचायतीचे मा. सदस्य अमोल हरिहर, जय हनुमान दहीहंडी संघाचे अध्यक्ष योगेशदादा भागवत, प्रसाद जाधव, अमोल रोकडे, श्रीकांत माने,चांगदेव शिरतोडे, प्रकाश गावडे तसेच प्राथमिक शाळा व हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी आबासाहेब मदने, त्रिंबक बाराते मामा, योगेश भागवत आणि प्रसाद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

 

🌱 **एक वही, एक नवी उमेद; एक पुस्तक, उज्ज्वल भविष्याची सुरुवात!**

 

*समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे म्हणजे केवळ मदत करणे नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना बळ देऊन उद्याचा सुजाण, सुसंस्कृत आणि सक्षम समाज घडविणे होय.*

 

स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाविषयी जागरूकता वाढते आणि दातृत्व, माणुसकी व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते.

 

💐 **स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन!** 💐

 

🙏 या स्तुत्य उपक्रमासाठी भागवत कुटुंबीय आणि शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, गोखळी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!