उद्या राजाळे येथे गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव
फलटण: दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री .ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव रविवार दि.१४ डिसेंबर रोजी राजाळे येथील श्री.किरणसिंह प्रकाश निंबाळकर व सचिन प्रकाश निंबाळकर यांच्या (निंबाळकर वस्ती) येथे संपन्न होत आहे. या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास आपण सर्व भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
फुलांची वेळ : पहाटे ५.५५ वा.महाप्रसाद वेळ : सकाळी.९ ते ४ राहील.
यावेळी एकतारी भजनी मंडळ सोनगाव. बंगला यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
कार्यक्रम स्थळ हे 26 फाटा नजीक निंबाळकर वस्ती राजाळे – सोनगाव रोड. फलटण जि.सातारा♦
Views: 176









